
मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरातील शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सवात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली. फडणवीसांनी ठाकरे सरकारची थेट मुघलांशी तुलना केली आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या कार्यक्रमावर सरकार बंदी आणत नाही. मात्र, शिवजयंती साजरी करताना सरकारकडून कलम 144 लावलं जातं अशी बोचरी टीका त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.
आम्हाला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जेव्हापर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तेव्हापर्यंत जयंती साजरी होत राहिल, असंही फडणवीसांनी म्हटलं. राज्यपालांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला संविधानाची आठवण करून दिली. फडणवीस म्हणाले, की ज्यांनी संविधान आणि महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाही, तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करू शकतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला