पहिल्या विदेश दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीम ‘काळ्या पट्ट्या’ घालून मैदानात उतरली होती !

Maharashtra Today

भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर अनेक क्षेत्रात भारतानं मोठी झेप घेतली. अर्थ, कला, विज्ञानासह क्रिडा विश्वात भारतीय खेळाडूंनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज क्रिकेट जगावर एक हाती अंमल गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं (Indian cricket team) मोठ्या कष्टातून वाट काढत हे यश खेचून आणलंय.

१५ ऑगस्ट १९४७ला भारत स्वतंत्र झाला आणि ऑक्टोबरमध्ये भारतीय क्रिकेट टीम पहिल्यांदा विदेश दौऱ्यावर गेली (first foreign tour). या दौऱ्याला घेऊन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, खेळाडू आणि सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात विशेष उत्साह होता.

दुखापतीचं मोठं संकट निर्माण झालं होतं

स्वातंत्र्याचा आधी भारत आणि इंग्लंड संघ एकमेकांसमोर आले होते. भारतीय क्रिकेट टीमचं प्रदर्शन यावेळी जबरदस्त होतं. याच प्रदर्शनाच्या जोरावर खेळाडूंची निवड करण्यात आली. निवडकर्त्यांनी अनेक बाबींचा विचार केला होता. काही चांगले खेळाडू दुखापतग्रस्त होते. त्यामुळं नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी एक नाव टायगर पटोदी म्हणजे सैफा अली खान यांच्या वडिलांच होतं. संघात अनेक प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यात आली.

देशाचं विभाजन झाल्यामुळं मुश्ताक अली आणि फजल मेहमुद यांना दौऱ्यावर जाता येणं शक्य नव्हतं. कॅप्टन विजय मर्चंट दुखापतीमुळं अनफिट होते. केलेली सर्व तयारी वाया जाणार अशी चिन्हं निर्माण झाली होती. तरी विचार विनीमय करुन टीम निवडण्यात आली. लाला अमरनाथ यांच्याकडे कर्णदारपद सोपवण्यात आलं तर विजय हजारे उपकर्णधार होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे डॉन ब्रॅडमनसारखं मोठं नाव होतं.

ऑस्ट्रेलियासोबत होती टक्कर

भारतीय टीमच्या दौऱ्याबद्दल प्रसार माध्यमही उत्सुक होती. काही जेष्ठ खेळाडूंना रिपोर्टींगसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं. त्यात देवधर आणि दिलिप सिंहांसारखे जेष्ठ क्रिकेटर होते. भारतीय टीमनं अनेक संकटांना तोंड देत ऑस्ट्रेलिया गाठली.

पवासामुळं मालिकेवर विर्जन पडलं. पावसामुळं पीचपुर्ण बदललं. भारतीय संघाला नव्या आव्हानांना तोंड देणं भाग होतं. स्वातंत्र्यानंतर पहिलाच दौरा असल्यामुळं भारतीय खेळाडू उत्साही होते. त्यांच मन देशप्रेमानं भरलं होतं.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३८२ धावा केल्यानंतर डाव घोषित केला. डॉन ब्रडमन यांनी या सामन्यात शतक केलं होतं. आता भारतीय खेळाडूंची बारी होती. त्यांच्या खांद्यावर बऱ्याच अपेक्षांच ओझ होतं. नवे चेहरे होते. अनुभवी खेळाड़ू दुखापतग्रस्त असल्यामुळं त्यांनाच डाव सांभाळायचा होता. पहिल्या डावात भारतीय संघ फक्त सर्वबाद ५४ धावा करु शकला. तर दुसऱ्या डावात भारतीय टीम मात्र ९८ धावांमध्ये खेळ आटोपला. पहिल्याच सामन्यात २२६ धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला.

पावसामुळं अडचणी

दुसऱ्या सामन्यात पीच पावसानं ओली झाल्यामुळं भारतीय संघाला मोठं कष्ट उपसावं लागलं. भारतीय संघानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला डाव १८८ धावांमध्ये आटोपला. ऑस्ट्रेलियाला १०७ धावांवर ऑलआउट केला. दोन्ही टीमनी ८१ धावांची बढत घेतली. भारत जिंकेल अशी आशा निर्माण झाली होती तितक्यात पावासानं ख्वाडा घातला दुसरा सामना ड्रॉ झाला.

ऑस्ट्रेलियानं १-० अशी आघाडी घेतली होती. दुसरा सामना पावसामुळं ड्रॉ झाला. तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. चौथा सामना देखील अतितटीचा होता. चौथा सामना सर्वच भारतीयांच्या आठवणीत स्थान मिळवून आहे. विजय हजारे यांनी पहिल्या डावात ११६ तर दुसऱ्या डावात १४५ धावा केल्या. दोन्ही डावात शतक करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. तरी चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

पाचव्या सामन्यात काळ्याफिती घालून मैदानात उतरली भारतीय टीम

चौथा सामना संपला आणि भारतीय टीमपर्यंत दुःखद बातमी पोहचली. भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या महात्मा गांधींची हत्या झाल्याचं त्यांना समजलं. या घटनेमुळं सर्वच भारतीय खेळाडूंचे हृदय हेलावून गेलं होतं. पुढचा पाचवा सामना न खेळता भारतीय टीम परणार होती. या विषयावर पुन्हा विचार करायची भारतीयांवर वेळ आली. त्यांनी विचाराअंती निर्णय बदलला. पाचव्या सामन्यात काळी पट्टी बांधून भारतीय संघ जडअंतःकरणानं मैदानात उतरला.

ऑस्ट्रेलियानं भारताचा या सामन्यात पराभव केला. या सामन्यात डॉन ब्रॅडमन यांनी या सामन्यात ४२९ धावा ठोकल्या. पुर्ण मालिकेत त्यांनी सर्वाधिक ७१५ धावा करत विक्रम केला. स्वातंत्र्यानंतर पहिलाच बाहेरचा दौरा करायला गेलेला संघ पराभूत झाला. याला अनेक कारणं होती. या पराभवातून शिकून भारतीय संघ प्रगती करत राहिला. आज क्रिकेट जगात सर्वात प्रतिभावंत खेळाडू भारतीय आहेतय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button