महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह, लसीकरणाबद्दल मात्र संभ्रम कायम?

CM Thackeray-Maharashtra Vaccination

महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केलं, ते म्हणाले, “महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना वंदन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एकाच दिवशी, शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान महाराष्ट्र निर्मितीत आहे.”

कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासंबंधी निर्णयाबद्दलच्या स्पष्टतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याकडे संपूर्ण राज्याचे कान लागले होते. राज्यात कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती आटोक्यात आणण्यात राज्य सरकार (State Government) कमी पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळं कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावरच मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनात भर दिला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कालच माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली होती. येत्या जुन ते ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं विधान स्वतः आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज मत व्यक्त केलं ते म्हणाले, “सगळ्या जगात लाटांमागून लाटा येत आहेत. एकूण लाटा किती येणार, हे आपण किती काळजी घेतोय यावर अवलंबून आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असं वाटलं नाही. उद्योग आणि कामगार नेत्यांशी मी बोललो. त्यांना काय करायचं याची सूचना दिली आहे. तिसरी लाट आपण सगळ्यांच्या सहकार्याने थोपवल्याशिवाय राहणार नाही.” असा आशावाद ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आणखी कडक निर्बंधाची गरज?

राज्यातल्या कोरोनाच्या गंभीर स्थितीवर उच्च न्यायालयाने ही मत व्यक्त केलंय. कोरोना रोखण्यासाठी आणखी कठोर निर्बंध का लावू नयेत अशी विचारणा उच्च न्यायलायानं राज्य सरकारला केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले, “जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का असं उच्च न्यायालयाने महाधिवक्तांना विचारलं होतं. मी तुम्हाला विचारतो. मला वाटतं ती वेळ आली असली, तरी तसा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. निर्बंध लावून काय झालं, तर रुग्णसंख्या कमी झाली. आपण जर बंधन घातली नसती तर आजच्या दिवशी महाराष्ट्रात ९.३० ते १० लाख सक्रिय रुग्ण असू शकले असते. रुग्णवाढ उताराला लागलेली नाहीये. पण आपण ती ६ ते ६.३० लाखापर्यंत थांबवली आहे. अजूनही काही काळ आपल्याला बंधन पाळण्याची आवश्यकता आहे.” असं मुख्यमंत्री म्हणाले.

लसीकरणाबाबत संभ्रम कायम

राज्यात वणव्याप्रमाण फोफावणाऱ्या कोरोनाला अळा घालण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. परंतू लसीकरण केंद्रावरील वास्तव या उलट आहे. लसीकरणाचं नियोजन करण्यात नेमकी चुक कोणाची यावर केंद्र आणि राज्य एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी सामान्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहे. आठवडा- आठवडा रांगेत थांबून ही नागरिकांना लस मिळत नाहीये. यामुळं घरी सुरक्षित असलेल्या नागरिकांना लसीकरणाच्या रांगेतच कोरोनाच संसर्ग होईल अशी भिती सामान्यांच्या मनात निर्माण झालीये.

या विषयावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) यांनी धक्कादायक विधान केलंय. मुख्यमंत्री म्हणाले, “लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या. आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु. ६ कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू.” असं विधान त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button