दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहाजीराजेंचे स्मारक विद्युत रोषणाईने प्रकाशमान

Shahaji Raje's memorial

औरंगाबाद :- शहाजीराजे स्मारकाचा वर्षानुवर्षे असलेला अंधकारमय परिसर दीपावलीच्या पूर्वसंध्येला प्रकाशमान झाला. कृतिशीलता दाखवली तर सर्व काही शक्य होते. हे शक्य औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केवळ सात दिवसात करून दाखवले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वेरूळ (ता. खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथील मालोजीराजे यांच्या गढीची आणि शहाजीराजे यांच्या -स्मारकाची पाहणी 4 नोव्हेंबर 2020 रोजी केली होती. त्यावेळी रात्री अंधारात त्यांनी मालोजीराजे गढी व शहाजीराजे स्मारकाची पाहणी केली होती. इतिहासाचा हा मुकसाक्षीदार अंधारात पाहून त्यांनी त्यावेळीच आश्वासन दिले की दीपावली पूर्वी हा परिसर प्रकाशमान करू. आणि हे आश्वासन केवळ सात दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कृतिशील अधिकारी असल्याचे दाखवून दिले. गुरुवारी सूर्य अस्ताला गेला आणि शहाजीराजे स्मारक परिसर प्रकाशमान होत गेला.

मालोजीराजे यांच्या गढीचे जतन आणि शहाजीराजे स्मारकाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा कृतिशील मानस आहे. या कृतिशील कामातून येत्या काही दिवसातच या ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा विकास करून लवकरात लवकर जनतेला इतिहासाचा हा अनोखा ठेवा पाहण्यासाठी खुला करू, असे त्यांनी अभिवचन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER