
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Suicide) ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आले आहे . त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते शनिवारी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणावरून शिवसेनेला लक्ष्य केले. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शनिवारी चिपळूण येथे प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना या सगळ्याविषयी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर फार बोलणे टाळले. या प्रकरणात मी थोडी माहिती घेऊन बोलेन, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी काढता पाय घेतला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला