
घटना इंग्लंडमधील आहे. जेस अल्ड्रीज (२४) या तरुणीचे आणि रायन शेल्टन (२९) यांचे प्रेम होते. दोघांनी लग्न केले. २८ जानेवारीला जेसने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ती बाळाच्या जन्माच्या आनंदात असताना तिला धक्कादायक बातमी कळली. रायन आणि तिची आई जॉर्जिना (४८) यांनी पळून जाऊन नवा संसार सुरू केला आहे !
जेस म्हणते, आईचे आणि रायनचे असे काही संबंध असतील याची मला कल्पना नव्हती. रायन माझ्या आईकडे यायचा त्यावेळी जॉर्जिना (आई) आणि रायन जरा मोळके वागायचे पण त्यांचे संबंध असतील अशी मला कधीही शंका आली नाही; त्यामुळे मी त्याकडे लक्ष दिले नाही. २८ जानेवारीला मी दुसऱ्या बाळाला जन्म दिला त्याच दिवशी रायनने मला मॅसेज पाठवला – आपले नाते संपले! त्याने माझ्याशी असलेले नाते तोडले होते. मला याचा अर्थच लागत नव्हता.
मात्र, थोड्यात वेळात सर्व उलगडा झाला. मला कळले की, रायन आणि माझी आई दोघेही फरार झाले आहेत. रायन आणि जॉर्जिना यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या संबंधांची माहिती देऊन – आम्ही नव्याने संसार सुरू करतो आहे, असे कळवले !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला