मोठ्या पडद्यावर अभिषेकपेक्षा अमिताभ बच्चन यांनाच जास्त मागणी

Abhishek Bachhan & Amitab Bachhan

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे असे सुपरस्टार आहेत की जे या वयातही प्रचंड अॅक्टिव्ह असून खास त्यांच्यासाठी भूमिका लिहिल्या जातात. आधुनिक जगाशी ते नेहमी कनेक्टेड असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कोट्यावधी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला त्यांनी गेल्या वर्षी त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ दिला आणि ओटीटीवरही पदार्पण केले. पण अन्य कलाकारांप्रमाणे ते ओटीटीवरच थांबलेले नाहीत. थिएटर सुरु होताच त्यांचा दोन नवे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. तर दुसरीकडे अभिषेक बच्चनचे (Abhishek A Bachchan) काही सिनेमे ओटीटीवरच रिलीज झाले असून अजूनही एक-दोन सिनेमेही ओटीटीवरच रिलीज केले जाणार आहेत. अभिषेकचे सिनेमे मोठ्या पडद्यावर यशस्वी होणार नाहीत असे निर्मात्यांना वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे तर अमिताभ प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणू शकेल असा विश्वास असल्यानेच त्यांचे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज केले जात आहेत.

एप्रिल महिन्यात प्रथमच बाप अमिताभ आणि मुलगा अभिषेक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र अमिताभचा सिनेमा ‘चेहरे’ ९ एप्रिल रोजी थिएटरमध्येच रिलीज होणार असून अभिषेकचा सिनेमा ‘बिग बुल’ मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म ८ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार आहे. या दोघांनी यापूर्वी अनेक सिनेमात एकत्र काम केलेले आहे. याची यादी आम्ही तुम्हाला काही महिन्यांपूर्वी एका लेखात दिलीच होती. मात्र आता दोघेही प्रथमच एकमेकांसमोर पण दोन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभे ठाकणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर सिनेमा असून याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत इमरान हाश्मी दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड यांनी केली आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला असल्याने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होईल असे म्हटले जात आहे.

अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ हा सिनेमा हर्षद मेहता या कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या शेअर ब्रोकरच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूझ आणि निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. याच कथानकावर हंसल मेहता यांनी स्कॅम नावाची एक वेबसीरीज तयार केली होती. प्रतीक गांधीने हर्षद मेहताच्या भूमिकेत कमाल केली होती. त्यामुळे या सिनेमाची आणि अभिषेकच्या अभिनयाची स्कॅम आणि प्रतीक गांधीबरोबर नक्कीच केली जाणार आहे. आणि यात प्रतीक भाव खाऊन जाईल असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER