नागपूर अलर्टवर!

Ravindra Thackeray

नागपूर : राज्यभरात कोरोनाचा (Corona) कहर वाढला असता विदर्भातही पाय पसरले आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी अमरावतीत १२ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आले. नागपूर (Nagpur), यवतमाळ (Yavatmal), वर्धा (Wardha) आणि भंडाऱ्यात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला नसला तरी नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे.

नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे. अनिर्बंध वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहे. या अंतर्गत नागरिकांकडून तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरू नये, यासाठी सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणार आहे. खाजगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार, अशी माहिती रवींद्र ठाकरे यांनी दिली.

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट
गेल्या २४ तासांत ७२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यांनंतर सर्वाधिक ९ हजार ४४३ चाचण्या झाल्या. त्यापैकी ७२५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण सध्या ७.६७ टक्के आहे. ६ जणांचा मृत्यू, तर ५०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाची चिंता बनत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER