सोमवारी 5 हजार 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 5 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus Maharashtra

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) आज थोड़ा दिलासा मिळाला असून, राज्यातील कोरोना (Corona) बाधितांची संख्या सोमवारी थोडी कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 57 लाख 93 हजार 424 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21 लाख 06 हजार 094 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 54 लोक होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 891 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 53 हजार 113 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER