सोमवारी नागपूर जिल्ह्यासाठी ५,११३ तर पुणे जिल्ह्यासाठी ५,०६५ रेमडेसिवीर इंजक्शनचे वाटप

नागपूर : राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. जालन्यासह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा जास्त तर नागपूरसह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा कमी रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करून गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर संबंधित जिल्ह्यांकडून तत्काळ परत घेण्याचा आणि ते रेमडेसिविर नागपूरसह इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये योग्य संख्येत वितरित करण्याचा आदेश नोडल अधिकाऱ्याला दिला होता. त्यानंतर आज नागपूर जिल्ह्यातील २०३ रुग्णालयांना ५,११३ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील ६२३ रुग्णालयांना आज ५,०६५ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

NAGPUR

Pune

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button