झुंजीवर सट्टा खेळणारे जामिनावर सुटले; कोंबडे मात्र २५ दिवसांपासून पोलीस कोठडीत !

मिदिगोंडा :- कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा खेळणाऱ्या सटोडियांना १० जानेवारीला पोलिसांनी कोंबड्यांसह अटक (Hens arrested) केली. सट्टेबाज जामिनावर सुटलेत; पण कोंबड्यांवर कोणीही दावा केला नाही.  म्हणून ते अजूनही कोठडीत बंद आहेत!

ही घटना तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील आहे. संक्रातीनिमित्त कोंबड्यांची झुंज सुरू होती. लोक सट्टा लावत होते. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी  धाड टाकली. १० सट्टेबाजांना अटक केली. सोबत झुंजीचे दोन कोंबडे आणि एक बाईकही ताब्यात घेतली.

सट्टेबाजांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांना जामीन मिळाला. सुटले. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कोंबड्यांवर कोणीही दावा केला नाही. त्यामुळे त्यांना सोडले नाही.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कोंबड्यांना सोडण्यात येईल. सट्टेबाजीचा पुरावा म्हणून कोंबडे महत्त्वाचे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सुनावणीनंतर कोंबड्यांना सोडण्याचे आदेश मिळतील.  त्यावेळी त्यांचा लिलाव करू, असे पोलीस म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER