प्रकाश आंबेडकरांचा मान राखत वारिस पठाण, इम्तियाज जलील लोकसभा लढणार?

on honor of prakash ambedkar varis pathan and imtiaz jalil lok sabha?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्रात एमआयएम दोन लोकसभा मतदारसंघांत लढणार असल्याची माहिती भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिल्यानंतर भायखळा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. पक्षाचा आदेश म्हणून मी रिंगणात उतरतो आहे, असे त्यांनी लगोलग स्पष्ट केले आहे.

हि बातमी पण वाचा : वंचित बहुजन आघाडीचे चार खासदारही निवडून येणार नाहीत – धनंजय मुंडे

प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसाठी औरंगाबाद अणि मुंबईतील उत्तर मध्य असे दोन लोकसभा मतदारसंघ सोडले आहेत. त्यामुळे त्यांचा मान राखत मुंबईतून वारिस पठाण आणि औरंगाबाद येथून इम्तियाज जलील लोकसभा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पूर्व, कलिना व कुर्ला या मतदारसंघातील अल्पसंख्याक आणि दलित समाजातील समाजाच्या मतांची गणिते लक्षात घेत एमआयएम या निवडणुकीत उतरणार आहे. पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून पठाण यांना तेथून लढण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती एमआयएमच्या सूत्रांनी दिली. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या अविनाश बर्वे यांना कुर्ला मतदारसंघात २५ हजार ७४१ मते मिळाली होती. वांद्रे पूर्व मतदारसंघात रहबर खान यांना २३ हजार ९७६ मते मिळाली होती.

हि बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:चे हसे करु नये आ. जितेंद्र आव्हाड यांचा टोला

मात्र, २०१५ च्या पोटनिवडणुकीत हे प्रमाण घटून खान यांना १५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. पक्षाचे औरंगाबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका मांडली होती. त्यातून वाद झाला होता. त्यानंतर दोन मतदारसंघ पक्षाला मिळाले; पण त्यातील मुंबईच्या मतदारसंघात इच्छा नसतानाही पठाण यांना उतरवले जात असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांचे एकमेव नाव पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यांसमोर आहे. इम्तियाज यांनीदेखील आपल्यासाठी ही संधी असेल, असे सांगत लढण्याची तयारी दर्शवली आहे. चार वर्षांच्या आमदारकीच्या काळात इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला टोकाचा विरोध करत आपली वोटबॅंक घट्ट केल्याचे बोलले जाते. शिवसेनेला पराभूत करण्याची ताकद फक्त एमआयएममध्ये आहे, असा दावादेखील ते करतात.

 

 

हि बातमी पण वाचा :- प्रकाश आंबेडकरांचे आव्हान नाही, ते माझे जवळचे मित्र – रामदास आठवले