शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना ४,२२३ रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वाटप

Remedesivir - Maharashtra Today
Remedesivir - Maharashtra Today

नागपूर : राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. जालन्यासह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा जास्त तर नागपूरसह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा कमी रेमडेसिवीर इंजेक्शन्स देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करून गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर संबंधित जिल्ह्यांकडून तत्काळ परत घेण्याचा आणि ते रेमडेसिवीर नागपूरसह इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये योग्य संख्येत वितरित करण्याचा आदेश नोडल अधिकाऱ्याला दिला होता. त्यानंतर आज नागपूर जिल्ह्यातील (नागपूर जिल्हा) ५० रुग्णालयांना ४,२२३ रेमडेसिवीर इंजक्शन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button