एमआयएम मुख्यमंत्र्यांच्या बाजूने, कंगनाला दिला निर्वाणीचा इशारा

Imtiaz Jalil-CM Uddhav Thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवरून (Kangna Ranaut) शिवसेनेने (Shivsena) आक्रमक भूमिका घेतली असून, कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख केला. या प्रकरणी आता एमआयएम मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभी ठाकली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी कंगनाला टोला लगावला आहे.

खासदार जलील म्हणाले, “शिवसेना आणि आमच्यामध्ये राजकीय मतभिन्नता असेल, मात्र उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणाही टॉम डिक आणि हॅऱीनं त्यांचा अनादर करणं हे अस्विकारार्ह आहे. कंगनानं तिच्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं. असा सल्लाही त्यांनी कंगनाला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER