मुंबई रोटरी क्लबला सदस्यशुल्कातून जीएसटी दिलासा

GST

मुंबई :- रोटरी इंटरनॅशलनशी संलग्न असलेल्या ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई क्वीन्स नेकलेस’च्या सदस्यांना त्यांचे सदस्यशुल्क, वर्गणी आणि प्रवेशशुल्क यातून जीएसटी दिलासा मिळाला आहे. आपल्याला जीएसटी भरण्यापासून सूट मिळावी, असा अर्ज रोटरी क्लबने जीसएटीबाबतच्या महाराष्ट्र लवादाकडे केला होता.

ही बातमी पण वाचा : गडकरी महोदय, अनिल अंबानींच्या कंपनीवर एवढी मेहरबानी का?

आपण आपल्या सदस्यांना इतर क्लबप्रमाणे जलतरण, उपाहारगृह, व्यायामशाळा आदी सुविधा देत नाही. त्यामुळे आपल्याला जीएसटीचे कलम २(१७) (ई) लागू होत नाही, असे रोटरी क्लबने लवादाकडे केलेल्या अर्जात म्हटले होते. आपण बिगर-नफा तत्वावर कार्य करणारी संघटना असल्याकडेही संस्थेने लवादाचे लक्ष वेधले होते.

रोटरी इंटरनॅशनल मानवतावादी कार्यासाठी जगभरातील सदस्यांना एकत्र आणते आणि जगभर शांतीचा प्रसार करीत असते. जगभरात संस्थेच्या ३५ हजारांहून जास्त शाखा आहेत, हे येथे उल्लेखनीय.