क्रिकेट ऑलिम्पिकच्या वाटेवर

३४५ दिवस बाकी

लॉर्डस, लंडन : क्रिकेट ऑलिम्पिकच्या वाटेवर असून २०२८ च्या लॉस एंजेल्स आॅलिम्पिकमध्ये हा इतिहास घडू शकतो असे एमसीसी क्रिकेट कमिटीचे चेअरमन माईक गॅटिंग यांनी सुतोवाच केले आहे. असे झाल्यास क्रिकेटच्या बहुप्रतिक्षित मागणीची पूर्तता होणार आहे. आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषद (आयसीसी)चे नवे सीईओ मनू साहनी यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून त्यांना २०२८ च्या आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची मोठी आशा आहे असे गॅटिंग यांनी म्हटले आहे. असे झाल्यास क्रिकेटसाठी ती फार मोठी गोष्ट ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : क्रिकेटमध्ये आता स्मार्टबॉल!

आॅलिम्पिक दोनच आठवड्यांचे असते, महिना-महिनाभर ते चालत नाही त्यामुळे आॅलिम्पिकसाठी चार वर्षात एकदा दोन आठवड्यांचा सामन्यांचा कार्यक्रम ठरवणे फार अवघड नाही. या दोन आठवड्यांच्या नियोजनासाठी तुमच्याकडे चार वर्षांचा अवधी असतो त्यामुळे ही फारशी अवघड बाब नाही. यादृष्टीने पुढील दीड वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राष्ट्रीय प्रतिबंधीत द्रव सेवन विरोधी संस्था (नाडा) च्या कार्यकक्षेखाली आल्याने एक प्रश्न मिटला आहे. त्याच्या आॅलिम्पिक समावेशाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे असे गॅटिंग यांना वाटते.

बर्मिगहॅमच्या २०२२ राष्ट्रकुल सामन्यांमध्ये महिलांच्या क्रिकेटचा समावेश जवळपास निश्चित असल्याची मा

ही बातमी पण वाचा : दिव्यांगाची पहिली वर्ल्ड सिरिज ट्रॉफी भारताकडे

ही बातमी पण वाचा : स्केटबोर्डिंगमध्ये असतील 80 स्पर्धक