ऑलिम्पिकचे स्वन बघणाऱ्या तरुण खेळाडूचा वीज कोसळून मृत्यू

katherine Diaz dies

टोकियो ऑलिम्पिक जर यंदा ठरल्यानुसार झाले तर सर्फिंग हा क्रीडाप्रकार पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळला जाईल. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सर्फिंग (Surfing) या कल्पनेनेच या खेळाच्या खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले आहे. ऑलिम्पिकसाठी ते जोमाने तयारीला लागले आहेत. अशीच एक खेळाडू आहे एल साल्वाडोरची कॕथरिन डियाझ (katherine Diaz) . अवघ्या 22 वर्षांची. टोकियोसाठी (Tokyo Olympic) पात्र ठरण्याकरीता ती प्रयत्न करत होती. ऑलिम्पिकचे पदक हे तर ध्येय होतेच पण ऑलिम्पिकमध्ये खेळायला मिळणं हेसुध्दा तिचे स्वप्न होते. पण बहुधा दैवाला ते मंजूर नव्हते. कॕथरिनचा वीज कोसळल्याने (Lightening) मृत्यू झाला आणि सारे ध्येय, स्वप्न अधुरेच राहिले.

साल्वाडोरच्या सर्फ फेडरेशनने तिच्या स्मृतीत म्हटलेय, आमच्या देशाचे नाव उंचावलेली एक ग्रेट अॕथलीट आम्हाला सोडून गेली आहे.ती लढावू होती. अल साल्वाडोर दुःखात आहे.

ही 22 वर्षीय खेळाडू शुक्रवारी आपले गाव असलेल्या एल टुन्को येथे सरावासाठी पाण्यात उतरलेली होती. त्यावेळी विजेने हा घात केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देणाऱ्या स्पर्धेची ती तयारी करत होती. तिच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय सर्फिंग असोसिएशनने म्हटलेय की कॕथरीन ही आनंद व उर्जेचे प्रतिक होती. तिच्या सारख्या खेळाडूंनीच सर्फिंगला स्पेशल आणि आवडीचा खेळ बनवला आहे. आंतरराष्ट्रीय पाताळीवर तिने आपली छाप सोडली आहे. तिने वर्ल्ड सर्फिंग गेम्स आणि आयएसए वर्ल्ड ज्युनियर सर्फिंग चॕम्पियनशीपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER