पेद्रेवाडीच्या वृद्धेचा वणव्यात होरपळून मृत्यू

होरपळून मृत्यू

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील लक्ष्मी नारायण येजरे (वय 72) या शेतकरी कुटुंबातील महिलेचा वणव्यात होरपळून मृत्यू झाला. लक्ष्मी येजरे या आपल्या गावाशेजारील काजू बागेत पालापाचोळा लोटण्यासाठी सकाळी 11 च्या सुमारास गेल्या होत्या.

सीएए, एनआरसीवरून महापौर यांची कोंडी

दरम्यान समोरून आगीचे लोट येऊ लागल्याने आपल्या बागेमध्ये वणवा लागेल म्हणून त्या वणवा विझविण्यासाठी पुढे जाऊ लागल्या. परिसरात असलेल्या वाळलेल्या गवतामुळे आग झपाट्याने त्यांच्या दिशेने आली व त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

आग विझविण्याकरिता आजूबाजूचे शेतकरी धावून आले व आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी त्यांना होरपळलेल्या स्थितीतील लक्ष्मी येजरे यांचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.