देवनारमध्ये अज्ञात वाहानाच्या धडकेमध्ये वृद्धाचा मृत्यू

accideent

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या एम वार्ड कार्यालयासमोरील टेनामेंट पार्कींगमध्ये एका वाहानाच्या धडकेमध्ये 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करुन देवनार पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळाल्यामाहितीनुसार, शनिवारी रात्री दोन वाजल्यानंतर ही घटना घडली. यातील अज्ञात आरोपीने शबानमीया हुसेनमीया शेख यांना जोराची धडक देऊन पळ काढला. यात शबानमीया हे गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शबानमीया स्थानिकांना दिसले. स्थानिकांकडून ही माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या देवनार पोलिसांनी प्राथमीक तपासाअंती सरस्वती नाडार यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी अज्ञात वाहानचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबई पोलिसांचे शहरात मिशन ऑल आऊट