मार्च-एप्रिलनंतर १००, १०, ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार

मुंबई :- १००, १०, ५ रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,  १००, १०, ५ च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनातून बाद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे. या जुन्या नोटा मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत जुन्या १००, १०, ५ आणि ५ रुपयांच्या नोटा चलनातून बाद होतील.

वास्तविक,  १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९ मध्ये १०० रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

बरेच व्यापारी किंवा दुकानदार १० रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयने म्हटले आहे की, ही बँकेसाठी मोठी अडचण आहे. म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरीदेखील अनेक लोक चलनामध्ये १० रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी १० रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहनही आरबीआयने केले आहे.

ही बातमी पण वाचा : देशातील सहकारी बँका अडचणीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER