‘अरे बघताय काय सामील व्हा’; 15 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या मनसेत ‘मेगाभरती’

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता ऍक्शन मोडवर (Action Mode) आले आहेत. त्यांनी स्वतः यात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांपासून मनसेत इन्कमिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र आता मनसेत मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. मनसेच्या १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदाच मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. यासाठी मनसेकडून नियोजन करण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. अरे बघताय काय सामिल व्हा, असं म्हणत मनसेने तमाम मराठीजनांना साद घातली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोबिंवली तसंच मिरा भाईंदर महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. याच महानगरपालिकासांठी खुद्द राज ठाकरे यांनी पुढे सरसावत गेल्या अनेक दिवसांपासून विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आहे.

मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. आजपासून ही सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. सदस्य होण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. मोबाईल वर स्कॅन करून, संकेत स्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे.

आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी स्वतःची सदस्य नोंदणी करणार आहेत. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सदस्य नोंदणी साठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा मजकूर काल रात्री व्हॉटस् अप करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे मनसेचे लक्ष्य आहे. मनसेच्या जाहिरातीमुळे शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनेवेळी व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये जाहिरात देऊन मराठी भाषिकांना शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी साद घातली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER