मनसेचा संताप ; लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड

MNS-Latur news

लातूर : सोयाबीनचे बियाणे उगवलंच नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यातील कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. मंगळवारी मनसे (MNS) शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालकांचे कार्यालयच फोडले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे (Santosh Nagargoje)आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूर कृषी संचालक कार्यालयात तोडफोड केली. या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली आहे.

दरम्यान खरीपातील सोयाबीनचे बियाणं बोगस असल्याच्या लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER