आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Cyber Crime

औरंगाबाद : ट्विटर प्रोफाईलधारकाने सोशल मीडियावर कोरोनासंदर्भात अफवा पसरवून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित राजेश शिंदे आणि स्वप्नील दीक्षित अशी दोघांची नावे आहेत.

शहरात संचारबंदीचा आदेश लागू असताना त्यासंदर्भात सोशल  मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि अफवा पसरविणारा मजकूर प्रसारित करण्यात आला. हा प्रकार ९ जुलै रोजी सायबर पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यावरून ट्विटर   प्रोफाईलधारक सुमित शिंदे व स्वप्नील दीक्षित  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक गीता बागवडे या करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER