प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल – संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने

Shmbhaji Raje & Udyan Raje & Prakash Ambedkar

सातारा :- छत्रपती शिवरायांचे वारसदार खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि खासदार उदयनराजे (Udayan Raje) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत छत्रपतींचे वारस असलेल्या राजांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. गुरुवारी सातारा, सांगली, कोल्हापूर येथे रस्त्यावर उतरून मराठा कार्यकर्त्यांनी आंबेडकर यांचा निषेध केला.

शुक्रवारी साताऱ्यात पुन्हा आंदोलन झालर. अ‍ॅड. आंबेडकर यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मोर्चाचे भागवत कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अ‍ॅड. आंबेडकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

ही बातमी पण वाचा : आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो – प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER