भगवद्गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आरोपींविरुद्धची तक्रार रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Karnataka High Court

बंगरुळू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले. भगवद्गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दोन ख्रिश्चन व्यक्तींविरुद्धची तक्रार  रद्द करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती एच. पी. संदेश म्हणालेत की – एखाद्या धर्माच्या प्रमुखांनी किंवा धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या धर्मांची अवहेलना करू नये. इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की कोणत्याही धर्माची बाजू घेत असताना, त्या धर्मप्रमुखांनी किंवा धर्माबद्दल भाष्य करणाऱ्या व्यक्तींनी इतर धर्मांची बदनामी करू नये.

त्यांनी दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधातली अन्य धर्मांची बदनामी केल्याची फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला. एका महिलेने केलेल्या तक्रारीबाबत हा खटला सुरू होता. या महिलेची तक्रार होती की, आरोपी महिलेच्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली. ह्या दोघांनीही भगवद्गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रही दाखल केले. आमच्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याने हा खटला रद्द करावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कोर्टाने आरोपींची मागणी फेटाळून लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button