शिवसेनेच्या माजी खासदाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट, खासदार अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा

shivajirao adhalrao patil - amol kolhe

पिंपरी चिंचवड : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kohe) यांचे बंधू सागर कोल्हे (Sagar Kolhe) यांनी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत.

फेसबुकवरुन एकेरी आणि आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यातील मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सागर कोल्हे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर कोल्हे हे खासदार अमोल कोल्हे यांचे बंधू आहेत.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नुकतीच राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी श्रेयासाठी प्रयत्न केल्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. ‘औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन कोल्हे यांनी केवळ नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे. अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना नेटिझन्सनी ट्रोल केले होते. त्यातच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने डॉ. कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावरही ट्रोल करीत कामाचे श्रेय आढळराव-पाटील यांना दिले’ असं माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले. सागर कोल्हे यांच्या नावे असलेल्या फेसबुक प्रोफाईलवरुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. डॉ. कोल्हे आणि शिवाजीराव यांच्यात अनेकदा राजकीय वाद निर्माण होत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER