आमदार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Shivendra Raje Bhosale

सातारा : साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या ८० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवेंद्रराजे यांनी तीन दिवसांपूर्वी (१८ डिसेंबर) आंदोलन करून पुणे-बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. भुइंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम दिलेला असूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक होऊन आंदोलन केले. तसेच त्यांनी आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरकरांना होणाऱ्या विरोधामागे जातीवाद : अभिनेते शरद पोंक्षे