पाठशाळा भावनांची

School

कालच्या लेखात आपण कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील भावनेचे महत्त्व, त्यांचा व्यक्तीवर होणारा शास्त्रीय परिणाम, म्हणजे मेंदूच्या कार्यपद्धतीचा भावना निर्मितीवर कसा परिणाम होतो ते बघितलं .व्यक्ती भावनेच्या आधीन कसा होतो ?स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता व भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध कसा ?तेही बघितलं .हे सगळं केवळ लहान मुलांसाठी उपयुक्त आहे असं नाही. तर याचा उपयोग प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा स्थर उंचावण्यासाठी निश्चितपणे करू शकतो.

एका तत्ववेत्ता एक विधान करतो. तो म्हणतो,” The main hope of a nation lies in the proper education of its youth.”

म्हणून शालेय शिक्षणात भावना साक्षरतेचा समावेश खरंतर खूप महत्त्वाचा आहे. आणि हा प्रयत्न पाश्चिमात्य देशातील अनेक शाळा व संस्थांमधून करण्यात येत आहे .सॅनफ्रान्सिस्को मधील नोव्हा नावाच्या अनोख्या पाठशाळेचे उदाहरण वाचनात आलं .डॉक्टर संदीप केळकर यांनी त्यांच्या अमेरिका वास्तव्यामध्ये, तिथे कुठले प्रयोग केले जातात ते स्वतः अनुभवले. ते लिहितात की, आपल्याकडे जशी हजेरी घेतली जाते व पारंपारिक पद्धतीने हजर वा प्रेझेंट असे मुले म्हणतात, त्याऐवजी वर्ग सुरू होताना एक एकाच नाव घेऊन पुढे विद्यार्थी केवळ हजर न म्हणता तो विद्यार्थी एक ते दहा मधला एक अंक निवडून सांगतो ,तो अंक असतो त्या विद्यार्थ्याच्या त्यावेळच्या भावनेचा निदर्शक .म्हणजे विद्यार्थ्याला आत्ता कसं वाटतंय ? निराश – दुःखी – उत्साही इत्यादी.१ म्हणजे खूप दुःखी निराश. आणि १० म्हणजे उल्हासित.

बाकी अंक या दोन भावनामधील मनस्थिती दाखवतात. कुणी म्हणते मी आज चार आहे, कुणी म्हणतं दोन आहे. उद्देश एकच हाअसतो भावनांचा शोध – प्रवास ! जास्त आणि कमी रेटिंग म्हणजे बरोबर किंवा चूक असं काहीही नाही हे पटवून दिलेले असल्याने प्रामाणिकपणे मुले रेटिंग करतात.मुख्य म्हणजे एवढ्यावरच न थांबता मुले आपल्या रेटिंग मागची कारणे सांगतात. ब्रेकफास्ट न केल्याने आई रागवली, मित्राशी सकाळी सकाळी बस मध्ये भांडण झालं, संध्याकाळी नवीन गेमच्या खरेदीला जाणार आहे. हे सांगणं ज्यांना कठीण जातं त्यांना चित्रकृती व कलाकृती ह्या इतर मार्गांनी भावना व्यक्त करू दिल्या जातात. स्वतःला कसं वाटतंय हे नेमकं सांगता येण्यासाठी मुलांची भावनिक शब्द संपदा असणे गरजेचे असते आणि त्यासाठी भावनेची नेमकी ओळखही गरजेची असते. भावनेचे आत्मभान नसेल तर कुणी कुणी मनात कुढत राहतं. नाहीतर दबलेल्या भावनांची तीव्रता वाढत जाऊन उद्रेक तरी होऊ शकतो. त्यासाठी अनेक ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात.अशा ऍक्टिव्हिटीज आपण स्वतःसाठी पण वापरू शकतो.

स्वतःच्या भावभावनांची ओळख करून घेताना नेमकं काय घडतं ? तर हळूहळू आपली स्वतःची स्वतःची छान ओळख होत जाते. मानसशास्त्र म्हणत की ,निसर्गामध्ये माणसाला फक्त स्वतःला ओळखण्याची गरज भासते .स्वतःचा शोध घ्यावासा वाटतो. इतर प्राणिमात्रांमध्ये ही जाणीव नसते. त्यामुळे प्रत्येक माणसाला त्याच्या सगळ्यामागे नकळत एकच प्रेरणा असते आणि ती म्हणजे” मी कोण आहे ?”याचा शोध घेणं. मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये हा शोध सारं काही हरवून बसतो आणि म्हणून ना अनेक दुःख समस्या समोर उभ्या राहतात.

स्वतःची भावनिक क्षमता वाढवताना मला या घडीला नेमकं काय वाटतंय ? त्यानुसार मला कसं बघ वर्तन करावसं वाटतय ? हे सारं समजून घेताना आपोआपच’ को s हम ‘चे उत्तर मिळत जाते. आपल्या इतरां बाबतच्या भावनाही अशाच विचारपूर्वक आपण जर समजून घेत गेलं, तर आपोआपच या दोन गोष्टींमुळे आपल्या भावना नेमकेपणाने व्यक्त होऊ लागतात .त्यामुळे अवतीभोवतीच्या जगा संदर्भात आहे आपली स्वतःची ओळख वाटते.

म्हणजे आजूबाजूचे लोक जेव्हा माझ्या मनाप्रमाणे वागतात, तेव्हा मी त्यांच्याशी प्रेमाने वागते तसेच इतर लोक त्यांच्या मनाप्रमाणे वागतांना जेव्हा माझ्या मनाविरुद्ध वागू पाहतात, तेव्हा सुद्धां त्यांच्याशी मी तितक्याच प्रेमाने वागते का ? असं स्वतःकडे निरखून पहात राहिलं, कि ती सवय आपल्याला लागते. मग आपल्याला असे सगळे प्रसंग दिवसभराचे मनात नोंद केले जातात, कि या या वेळी समोरच्याचं वर्तन माझ्या मनाविरुद्ध असूनही मी किती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिले. ही सवय लावतानाच आपलं वागणं अधिकाअधिक संयमित ,संतुलित आणि शिस्तशीर बनत जातं.

ह्याशिवाय इतरांच्या संदर्भात स्वतःच्या वागणुकीचा अर्थ लावताना ,आपोआपच आपल्याला इतरांची नीट ओळख होते . समोरच्या व्यक्तीलाही ओळखण्याची प्रक्रिया घडत जाताना ,त्याला काय आवडते ?काय सुखावते ?याचे तपशीलही कळत जातात. मुख्य म्हणजे ही भावनिक क्षमता कोणत्याही वयात वाढवता येते.

परस्परांवर प्रेम करता करता परस्परांची आणि पर्यायानं स्वतःची भावनिक क्षमता जर पती-पत्नीनी वाढवली तर आज विवाह विषयक चे प्रश्न निर्माण होतात आहे ते कमी होण्याला मदत होऊ शकते. कुठलही नातं निरोगी बनवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. आता या भावना क्षमतेत नेमकी कोणती कोणती कौशल्य असू शकतात ?

  • पहिलं कौशल्य म्हणजे स्वतःच्या भावभावनांची नीट ओळख करून घेणे

बरेचदा बाहेर किंवा ऑफिसमध्ये एखादी गोष्ट घडते आणि तिचा राग घरी आल्यावर घरच्या लोकांवर निघतो. स्वतःवरच्या ताण-तणावांचा वचपा मुलांवर बरेचदा नकळत निघतो. बरेचदा भूक झोप ही पण कामाच्या रगाड्यात स्वतःला कळत नाही आणि मग त्याचा राग कुठेही निघतो.

  • दुसरा म्हणजे स्वतःच्या भावभावना नीट ओळखल्यावर त्यांना काबूत ठेवून शिस्तशीर पणें त्या त्या वेळी व्यक्त करणे

माझे आर्टिकल लिहून झाले की ते माझा मुलगा mail करतो. हे आमचं दररोजचे ठरलेल रुटीन . एक दिवस कुठल्यातरी टेक्निकल चुकीने मूळ लेख डिलीट झाला. आणि कालचाच लेख फॉरवर्ड झाला. कशाने overlap झाला कळलं नाही. मला अक्षरशः डबल मेहनत करावी लागणार होती. पण त्याने ते मुद्दाम केलेलं नव्हतं. किंवा तो बेजबाबदारपणे पण हे काम करत नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यादिवशी मी माझ्या भावना ओळखल्या आणि शिस्तशीर रीतीने त्या व्यक्त केल्या. कशा ? त्याच्या कडून काहीतरी चूक झाली, आणि त्यामुळे आईला आता उगीचच कष्ट पडणार! हे त्याच्या चेहर्‍यावरून दिसत होतं. मी त्याला सांगितलं,”ठीक आहे ना ! तसाही टायपिंगला फार वेळ लागणार नाही. मी करून टाकते फक्त तू संबंधितांना तसं कळव . आणि अरे माणूस आहे, तर चुका होतातच. दररोज तूच पाठवतोस ना बरोबर !”त्याला एकदम बर वाटलं. आणि मी माझ्या रागावर ताबा ठेऊ शकल्यामुळे मलाही छान वाटलं.

यात मी भावनिक क्षमतेच्या आणखीन एक कौशल्याचा वापर केला. मी त्याची भावना जाणून घेऊन त्याची कदर केली.
या क्षमतेमुळे इतरांसमवेत जगणं, व्यवहार करणे, सगळं आपोआपच सोप्प होत जात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते तणावरहित होत जातं. त्यामुळे अशा व्यक्तीला अधिक आनंदात जगता येतं.

  • स्वतःच स्वतःला प्रेरणा देणे

एकदा भावनिक शिस्त आली की आपण आनंदात जगू लागतो. उत्साहा वाढवून वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि कुठल्याही अडचणींचा बाऊ न करता त्या नीट पार पाडता येतात. मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना बाह्य पुरस्काराचेही गरज वाटत नाही .आणि अपयशाने खचूनही जायला होत नाही. जगण्यातल्या यश-अपयश याचा नेमका अर्थ कळतो. एका मुलाखत घेणाऱ्या माणसांना एडिसनला खोचकपणे प्रश्न विचारला.” तुमचा हा यशस्वी प्रयोग समजला पण त्यापूर्वीच्या इतक्या शेकडो अपयशाबाबत तुम्हाला काय म्हणायचं ?” त्यावर एडिसन म्हणाला, “त्या प्रत्येक अपयशाने यश मिळवण्यासाठी मी काय काय टाळले पाहिजे ते नेमकेपणाने मला शिकवले आणि मला सुधारायची दिशा दाखवली.”

  • दुसऱ्याच्या भावभावना जाणून घेऊन त्यांची कदर करणे

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला भावभावना असतात त्याच प्रमाणे त्या इतरांनाही असतात. इतरांनाही आपापले सुखदुःख असतात ,स्वतःच्या आवडीनिवडी असतात, आणि त्याबाबतच स्वातंत्र्य ही असत. याचं भान ठेवणं ही एक वेगळी क्षमता आहे. ही क्षमता आली की दुसऱ्याला समजून घेता येते.

त्यांच्या दुःखावर फुंकर घालताना नेमक काय करावे ? इतरांच्या विकासासाठी प्रसंगी आपण कोणता त्याग करायला हवा? हे वेळच्या वेळी लक्षात येतं. बऱ्याच लोकांना नुसत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज असते, उपाय नको असतात, किंवा दुःखावर फुंकर घालताना बरेच जणांना सहानुभूतीचे बोल अजिबात आवडत नाहीत. अशावेळी फक्त आपलं अस्तित्व आजूबाजूला पण न जाणवण्यासारखा ठेवणं एवढ्याचीच गरज असते.

या क्षमतेमुळे दोघांचाही आत्मविश्वास वाढवून परस्परांशी स्नेह जुळल्याने, जीवन बहुरंगी आणि बहुआयामी होते. आज-काल सुशिक्षित पणामुळे बुद्धिवादाच्या नादामध्ये आपल्या वर्तणुकीत भावनेचा ओलावा गमावतोय का काय ? असंच वाटतं. काहीजण मात्र आवर्जून स्वतःच्या वर्तनात तो भावनिक ओलावा कायम ठेवतात, आपल्या भावनिक क्षमता कष्टाने आणि सातत्याने वाढवीत राहतात ,या सातत्याचे फळ म्हणूनच त्यांचं दैनंदिन जीवन तणावरहित होत जात.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER