ओडिशा सरकार लॉकडाऊनमध्ये घेते भटक्या जनावरांचीही काळजी

Odisha government also takes care of stray animals in lockdown

भुवनेश्वर : ओडिशात (Odisha government) ५ मे पासून लॉकडाऊन (corona lockdown) लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांचे हाल होऊ नये म्हणून सरकार अन्न-धान्याची व्यवस्था व्यवस्था करते. ओडिशा सरकारने लॉकडाऊनच्या काळात जनतेचीच नव्हे तर भटक्या जनावरांचीही (stray animals) काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnaik) यांनी या जनावरांच्या चारा-पाण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

हा निधी राज्यातील ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि अन्यत्र योग्य ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. राज्यात सर्व भागात स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांच्या मदतीने शासन भटक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button