
औरंगाबाद: हे सरकारच नव्हे तर सरकारचा अध्यक्षही बहिरा आहे, अशी हरिभाऊ बागडेंच्या व्यंगावरून काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह टीका केली आहे.
पैठण तालुक्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या दुष्काळ सभेत माजी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली.
मी हरिभाऊ बागडेंना छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी मला खाली बसायला सांगितलं आणि म्हणाले चांगली झाली… असा प्रसंग सांगत असताना त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांवर ते बहिरा असल्याची टीका केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे वक्तव्य शोभणारं नाही, अशी चर्चा औरंगाबादमध्ये होत आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक जोराने झडतील, हे खरे असले तरी कोणाच्याही व्यंगावरून टीका करणे योग्य नाही अशी चर्चा औरंगाबादमध्ये आहे.