करुणा मुंडेचे ‘ते’ पुस्तक वादाच्या भोवऱ्यात ; धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार

Maharashtra Today

मुंबई :- बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच यावरून वाद मात्र सुरू झाले आहेत. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मुख्यामंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आली आहे.

करूणा धनंजय मुंडे नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं जाहीर करण्यात आले. या फेसबूक पोस्टमध्ये वापरलेल्या एका पुस्तकाच्या कव्हरवरील मजकुरामुळे वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमधील फोटोत असलेल्या पुस्तकाच्या कव्हरवर “होली बायबल” असं लिहिलेलं आहे, तर त्याखाली प्रेम हा शब्द मोठ्या आकारात आहे. त्यामुळं होली बायवल या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

जगातील सर्वच ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. बायबलला अनन्य साधारण महत्त्व असून करूणा धनंजय मुंडे यांच्या फेसबूक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होली बायबल असे इंग्रजीत लिहून पुस्तकाचं प्रमोशन केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळं ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही पोस्ट तात्काळ हटवावी. तसंच संबंधितांना असे कृत्य करण्यापासून परावृत्त करावं आणि योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे पत्र लिहिले .

दरम्यान, ज्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली होती, त्यावर रात्री उशिरा ही पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : माझ्या जीवनावर आधारीत प्रेमकथा लवकरच…; करुणा धनंजय मुंडेंच्या पोस्टमुळेक चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button