ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर

ठाणे : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आोबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यात आरक्षण सोडत जाहीर होताच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कोण याची चार्चा रंगु लागली आहे.

नुकतेच राज्यातील महापालिकांच्या महापैर पदासाठीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्या असून त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेसाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता, ओबीसी महिला सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तर, या आरक्षणामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कोण याची चार्चा रंगु लागली आहे.