ओबीसी आरक्षण : १५ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन; प्रकाश शेंडगेंचा इशारा

Prakash Shendge - OBC Reservation

मुंबई :- मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (SC) रद्द केल्यांनतर हा महाराष्ट्राचा ज्वलंत मुद्दा बनला आहे. या निर्णयाने मराठा समाजाने (Maratha Resrvation) आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या १६ जून रोजी मराठा मोर्च्याची हाक दिली आहे. यापाठोपाठ ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shedang) यांनीदेखील येत्या १५ जून रोजी ओबीसी मोर्च्याची (OBC Reservation) हाक दिली. यामुळे आता राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट घेतल्यानंतर शेंडगे यांनी मोर्च्याची हाक दिली. उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा केली.

दरम्यान, संभाजीराजेंनी १६ जून रोजी रायगडावरून मराठा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रकाश शेंडगे यांनीही ओबीसी मोर्च्याची हाक दिली आहे. एक डेडिकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करून हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही तर येत्या १५ तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button