महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेले : फडणवीस यांची टीका

Mahavikas Aghadi - Devendra Fadnavis

हिंगोली :- आरक्षणाच्याबाबत राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून ठोस माहिती सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) आठ वेळा तारीख वाढवून घेतली. मात्र त्याबाबत काहीच केले नाही. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांतील ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) गेले, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी केला.

कोरोनाचा स्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस हिंगोली जिह्ल्याच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने तेवढ्याच जागांचा प्रश्न होता. मात्र राज्य शासनाने माहिती सादर न केल्याने येत्या निवडणुकात ओबीसीला आरक्षण राहणार नाहीत. हा प्रश्न सुटेपर्यंत भाजपाचे आंदोलन सुरू राहील, असे फडणवीस म्हणालेत.

राज्य शासनाने शहराच्या दर्जाप्रमाणे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयाची देयके भरण्याबाबत आदेश काढले. यापेक्षा महात्मा फुले जनआरोग्यमध्ये सरसकट रुग्णालयांना सक्ती करणे गरजेचे होते. औरंगाबाद खंडपीठातील याचिकेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे देयके सादर करून महात्मा फुले योजनेतून परत करायची आहेत. मात्र ती स्वीकारली जात नाहीत. म्हणून देयके स्पीड पोस्टने पाठवून पुरावे ठेवा, याबाबत पुन्हा दाद मागू, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button