ओबीसी आरक्षण : भुजबळ, वडेट्टीवार राजीनामा द्या; भाजप ओबीसी मोर्च्याची मागणी

chhagan bhujbal - vijay wadettiwar - Maharashtra Today

मुंबई : राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्च्याने केली आहे. तसेच याबाबत उद्या आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही घोषणा केली. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. यामुळे उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार या आंदोलनात सहभागी होतील. झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे टिळेकर यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, येत्या महिनाभरात सरकारने आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देताच आरक्षण रद्द झाल्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी टिळेकरांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button