ओबीसी संघटना आक्रमक : आज मुंबईपासून तर गोंदियापर्यंत थाळी बजाव आंदोलन

ओबीसी संघटना

नागपूर :  मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसींमधून (OBC) आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन केलं. ओबीसींचं हे आंदोलन आज दिवसभर सुरू राहणार असून मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरांसमोर आज निदर्शने करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करत विविध मागण्या मांडल्या. गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींची जनगणना झाली नाही. ही जनगणना करा. ओबीसींसाठीच्या ‘महाज्योती’ला सरकारने निधी द्यावा या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. पण ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असं सांगतानाच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे.

 

 

दरम्यान, संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांनी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार विकास ठाकरे यांच्या घरासमोर थाळी बजाव आंदोलन केले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER