आरक्षण बचावासाठी ओबीसी संघटना आक्रमक

Reservation

कोल्हापूर : सर्वार्थाने सधन व पुरेसे प्रतिनिधित्व असलेला समाज ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation ) वाटेकरी होऊ पहात आहे. शासनाने असे केल्यास ओबीसीवर फार मोठा अन्याय होणार आहे. ओबीसी आरक्षणमधील सांभाव्य अन्याय टाळण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज संघटनांनी गुरूवारी (दि. ८) सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने करण्याच्या घेतलेल्या निर्णय घेतला असल्याची महिती ओबीसी सेवा फाउंडेशनने दिली आहे.

सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयसमोर ओबीसी सेवा फाऊंडेशनच्या वतिने निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी सर्व ओबीसी समाज संघटना प्रतिनिधींनी सदरच्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी सेवा फाउंडेशनचे दिगंबर लोहार, प्राचार्य शिवाजीराव केळकर, अँड. रणजित गुरव, पी.ए.कुंभार, एकनाथ रसाळ, सुधाकर पेडणेकर, अनिल पोतदार, शामराव खोत, किशोर लिमकर, चंद्रकांत कावळे, ज्ञानेश्वर सुतार, अजय केळकर, अनिल सुतार केशव सुतार, व्ही.डी.लोहार आदींनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER