शरद पवारांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठरवू : प्रकाश शेंडगे

Prakash Shendge - Sharad Pawar

मुंबई : मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) आता धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे सरकारने धनगर समाजाचा (Dhangar Community) अध्यादेश काढण्याचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) अद्याप भेटायची वेळ दिलेली नाही. त्यांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिली.

“धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जनआंदोलन उभारू, असा इशाराही शेंडगे यांनी दिला .

मराठा आरक्षण मागताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. यापूर्वीच्या ५८ मोर्च्यांमध्ये ४० टक्के जनता ही दलित-बहुजन होती म्हणून पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्यावरचे आरक्षण त्यांनी घ्यावे. जर त्यांना मान्य असेल तर मग आम्ही खांद्याला खांदा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ.” अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.

“भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांचे विधान योग्य आहे. या लोकशाहीत गोरगरिबांना न्याय मिळाला का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला आहे. आजही गेरगरिबांची वाताहत होत आहे. लोकशाहीचा काय उपयोग, राजेशाहीला आमचा पाठिंबा आहे. मूठभर लोकांनी गरिबांच्या डोक्यावरचं लोणी लोकशाहीत खाण्याचं पाप केलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी आमचं म्हणणं ऐकावं, आम्हालाही सोबत घ्यावं, एवढंच आमचं सांगणं आहे. ” असे प्रकाश शेंडगेंनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER