पोलिसांविरोधात उपोषण न करण्यासाठी फिल्टरची मागणी करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या नेत्याला अटक

MD for sale 1 arrested in thane

सांगली : पोलिसांच्या विरोधातील उपोषण मागे घेण्यासाठी आणि त्रास न देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या वॉटर फिल्टरची मागणी करत असल्याने अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रफीक अमीरहमजा मुजावर (वय 46, रा. कुपवाड) याला पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीतील शंभरफुटी रस्ता पुन्हा आकार घेतोय

कुपवाड पोलिस ठाण्यातील वाहतूक नियंत्रक पोलिस सचिन पाटील यांच्या विरोधात मुजावर रविवारी शहरातील सोसायटी चौकात एक दिवसाचे उपोषण करणार होता. ते उपोषण मागे घेण्यासाठी आणि पोलिसांना अन्य स्वरूपाचा त्रास द्यायचा
नाही, यासाठी मुजावरने 15 हजार रुपयांचा वॉटर फिल्टर देण्याची मागणी केली.ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना मिळाली. उबाळे यांनी मुजावर याची मागणी खरी आहे का, याची

तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिस पाटील व मुजावर यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्हॉईस रेकॉर्ड उपलब्ध करून घेतले. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस नाईक सतीश माने यांच्यासह दोन पंचांना पाठवून तक्रारीची खात्री केली. त्यावेळी मुजावरने पोलिस कर्मचारी पाटील यांच्याकडे खंडणी मागितल्याचे उघडकीस आले. त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली .