‘ओ करण जोहर के पालतू …’ कंगनाने दिलजितला सडकवले

Diljit Dosanjh-Kangan ranaut

मुंबई : कंगना राणावत (Kangana Ranaut) ट्विटरवर अतिशय सक्रिय असते. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध महिलेवर तिने टीका केली. यावरून अभिनेता व गायक दिलजित दोसांजने (Diljit Dosanjh) कंगनावर टीका केली. म्हणाला – कंगना, पुराव्यासह ऐक.

बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए! यानंतर कंगना भडकली आणि तिने दिलजितला सडकवले – ‘ओ, करण जोहर के पालतू, जो दादी शाहीन बाग में अपनी नागरिकता के लिए प्रदर्शन कर रही थी, वही बिलकिस बानो दादी जी किसानों के एमएसपी के लिए भी प्रदर्शन करती हुई दिखी। महिंदर कौर जी को तो मैं जानती भी नहीं। क्या ड्रामा चलाया है तुम लोगों ने? इसे तुरंत खत्म करो’, असे ट्विट  कंगनाने केले.

तिने दुसरे ट्विट केले – ‘सुनो गिद्दों मेरी खामोशी को मेरी कमजोरी मत समझना, मैं सब देख रही हूँ किस किस तरह से तुम झूठ बोलकर मासूमों को भड़का रहे हो और उनको इस्तेमाल कर रहे हो. जब शाहीन बाग की तरह इन धरनों का रहस्य खुलेगा तो मैं एक शानदार स्पीच लिखूँगी और तुम लोगों का मुँह काला करूँगी- बब्बरशेरनी’.

कंगनाचे मूळ ट्विट
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या ८७ वर्षांच्या आहेत. याच आजीची तुलना कंगनाने शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादीसोबत केली होती. ‘ही १०० रुपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तीच आहे. ’ असे ट्विट  कंगनाने केले होते. यानंतर सोशल मीडियावर कंगानाचा विरोध होऊ लागला होता. ट्रोल होताच कंगनाने हे ट्विट  डिलीट केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER