पतंगाचा नायलॉनचा मांजा ठरतोय जीवघेणा

kites.jpg

सांगली : हिवाळ्याची चाहूल लागली की पतंग (kites) उडवण्याच्या खेळाला जणू काही स्पर्धेचेच स्वरुप येते. पतंगासाठी लागणाऱ्या नायलॉनच्या (nylon) मांजाला बंदी असली तरी सर्रास त्याचाच वापर होत आहे, यामुळेच हाच खेळ कधी प्राण्यांच्या, तर कधी माणसांच्या जीवावर बेतू लागला आहे. त्यातून दुर्घटना घडत आहेत.

कोरोना स्थितीमुळे शाळांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे कंटाळलेली मुले नवनव्या खेळाकडे वळत आहेत. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यासाठी मुले बाहेर पडू लागली आहेत. अबालवृद्ध आपापल्या घरांच्या छतावर व मोकळ्या मैदानात पतंग उडवण्यात मग्न आहेत. तसेच कोणाचा पतंग किती उंच जातोय व कुणाच्या पतंगचा मांजा हा तलवारीच्या धारे सारखा आहे याची रस्सीखेच चालू झाली आहे. या पतंगाच्या मांजामुळे पतांगाची ‘काटा काट’ होत आहे. पतंगाचा मांजा रस्त्यावर येत असल्याने चालणाऱ्या तसेच टुव्हीलर वरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात आडकू लागला आहे. त्यातून काहींना दुखापत सुध्दा झाली आहे. अशी भयावह परिस्थिती सध्या निर्माण झाली असतानाही सर्वत्र पतंगाचा धोकादायक खेळ खेळलाच जात आहे. पतंगाच्या मांजा मध्येही नायलॉन व काची मांजा असे प्रकार आहेत.

या मांजासाठी काचेच्या भुकटीचाही तापर केला जातो. जीवघेण्या पतंग खेळाला कोठे तरी निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. पतंगाला वापरण्यात येणारा मांजा हा तलवारीला धार लावल्यालारखा आहे. कोणतीही पतंग कटलीच पाहिजे या अविर्भावातच सर्वत्र पतंग उडवले जात आहेत. या प्रकारास अळा घालण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER