एन. व्ही. रमणा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ; १६ महिन्यांचा असणार कार्यकाळ

Nv Raman - Sc - Maharastra Today
Nv Raman - Sc - Maharastra Today

नवी दिल्ली :- भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमणा यांनी आज शपथ  घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवन येथे सकाळी ११ वाजता सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. या प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobade) हे २३ एप्रिलला निवृत्त झाले आहेत. न्या. एन. व्ही. रमणा यांचे वय ६४ वर्षे असून, पुढील १६ महिन्यांपर्यंत ते सरन्यायाधीशपदी कार्यरत असतील.

एन. व्ही. रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील कृष्णा या जिल्ह्यात पोन्नावरम या गावात झाला. मृदुभाषी स्वभाव असलेल्या एन. व्ही.  रमणा यांनी १९८३ साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये रेल्वेसाठी स्थायी वकील म्हणून काम केलंय. २००० साली ते आंध्रप्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले. रमणा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला. २०१३ साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली.

२०१४ साली रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरू केलं. गेल्या काही वर्षांत  एन. व्ही. रमणा यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला. त्यामध्ये जम्मू-काश्मीरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याच्या  निर्णयाचा समावेश होता. सरन्यायाधीशांचे कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा जो निर्णय देण्यात आला, तो निर्णय देणाऱ्या बेंचमध्ये एन. व्ही. रमणा यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button