मिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन

Nutan Miss India

बॉलिवुडमध्ये (Bollywood)नूतने (Nutan) आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावले होते. लहानपणापासूनच चित्रपटात काम करणाऱ्या नूतनने वय झाले तरी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. नूतनच्या नावावर अनेक विक्रम असले तरी तिचा एक विक्रम फार कमी वाचकांना ठाऊक असेल. हा विक्रम आहे मिस इंडिया बनण्याचा. आता तुम्ही म्हणाल, आजवर अनेक नायिका मिस इंडिया झाल्या आहेत. त्यात नूतनने कसला विक्रम केला? तर आता तुम्हाला सांगूनच टाकतो. मिस इंडिया (Miss India) होणारी नूतन ही बॉलिवूडची पहिली नायिका आहे.

नूतनने ‘नल दमयंती’चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 1950 मध्ये 14 व्या वर्षीच नूतन ‘हमारी बेटी’ चित्रपटात नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 1952 मध्ये नूतनने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता आणि मिस इंडियाचा खिताबही आपल्या नावे केला होता. विशेष म्हणजे आज ज्या प्रमाणे मिस इंडियाला चित्रपटात घेतले जाते तेव्हा तसे नव्हते. मिस इंडिया खिताब जिंकल्यानंतरही नूतनला कोणी चित्रपटात काम दिले नव्हते. 18 वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच नूतनने ‘हमलोग’, ‘परबत’ ‘आगोश’ असे काही चित्रपट केले होते जे विशेष यशस्वी झाले नाही. सीमा चित्रपटानंतर मात्र नूतनने कधीच मागे वळून पाहिले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER