शूटिंगच्या पहिल्याच दिवशी नुसरत भरूचाला झाली दुखापत

Nushrat Bharucha

लॉकडाऊननंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) पुन्हा कामावर आली आहे. पण पहिल्याच दिवशी शूटिंग दरम्यान तिलाला दुखापत झाली. याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नुसरत भरूचाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिची दोन फोटो शेअर केली आहेत, ज्यात ती व्यायाम करताना दिसत आहे.

पहिल्या फोटोमध्ये नुसरत स्ट्रेचिंग एक्सरसाइज करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘कामावर परत आणि पहिल्याच दिवशी जखमी.’ यानंतर, तिने तिचे आणखी एक फोटो पोस्ट केले आहे, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘परंतु मला यातून सामर्थ्य प्राप्त होते.’ मात्र, दुखापत कशी झाली हे नुसरतने स्पष्ट केले नाही.

‘प्यार का पंचनामा’ आणि ‘प्यार का पंचनामा २’ मधून नुसरतला जबरदस्त लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या चमकदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हंसल मेहता यांच्या कॉमडी-ड्रामा चित्रपटामध्ये नुसरत भरुचा राजकुमार राव सोबत दिसणार आहेत. याशिवाय ती निखिल नागेश भट दिग्दर्शित ‘हुडंग’ चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. सनी कौशल आणि विजय वर्मासुद्धा या चित्रपटाचा एक भाग आहेत. १९९० साली अलाहाबादमधील विद्यार्थ्यांच्या चळवळीवर आधारित हा एक लव्ह स्टोरी चित्रपट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER