नर्सिंग शिकणाऱ्या तरुणीवर बलात्कार; एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला अटक

Rape

सांगली : वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला पृथ्वीराज पाटील ( निंबवडे, ता. आटपाडी ) याला अटक केली आहे.

आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील पृथ्वीराज पाटील हा सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला आहे. त्या महाविद्यालयाचा एक भाग असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये पीडित तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. त्या तरुणीशी ओळख वाढल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने तिच्याशी संपर्क वाढवला. दोघांचे प्रेमसंबंध जुळून आले. विजयनगर भागात त्याने पीडितेशी शरीरसंबंध ठेवले. यातून तरुणीला अपत्यही झाले. त्यानंतर मात्र पृथ्वीराज पााटील याने तिच्याशी संपर्क तोडून लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे घोर फसवणूक झाल्याने पीडित तरुणीने थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आणि पाटील याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी तत्काळ धाव घेऊन पृथ्वीराज पाटील याला रविवारी सायंकाळी अटक केली. त्याला उद्या कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER