तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Tulja Bhavani Temple - Kaustubh Diwegaonkar

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्हा पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील मंदिरांबाबतही निर्णय घेण्यात येत आहे. तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातील (Tulja Bhavani Temple) दर्शन पासची संख्या निम्म्यावर आणली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश
राज्यातील मंदिरे सुरू केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात रोज २० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या निम्म्यावर आणली आहे. मात्र, आता दर्शनासाठी १० हजार पास दिले जाणार आहेत, तर २ हजार पेड पास दिले जातील. त्याचबरोबर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि १० वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत लिखित आदेश जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे तीन दिवस मोठी गर्दी असते. तसेच मोठ्या उत्सवाला ३० हजार तर इतर दिवशी २० हजार मोफत पास दिले जात होते. पण आता ही संख्या निम्म्यावर आणली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER