आज नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उच्चांक; ४३ हजार १८३ जणांची नोंद

Coronavirus Maharashtra

मुंबई :- दिवसेंदिवस राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. आज महाराष्ट्रात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल २४९ रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणासाठी राज्य सरकार आता काय पावले उचलते, हे पाहावे लागणार आहे.

राज्यातील मृत्युदर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज ३२ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरेदेखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button