रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 125; जिल्हा शासकीय रुग्णालयाचा खुलासा

Corona Virus

रत्नागिरी(प्रतिनिधी): कामथे रुग्णालयातून चुकीची माहिती मिळाल्यामुळे एका रुग्णाचा गुरुवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या माहितीत समावेश होऊ शकला नाही, मात्र तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची रुग्णसंख्या 125 असल्याचे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खुलासा करण्यात आला आहे.

मिरज येथून गुरुवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये एक नाव कामथे येथील एका रुग्णाचे दाखविले होते. तथापि कामथे येथून येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास वेगळेच नाव पाठविण्यात आले होते. त्यामुळे आडनाव भिन्नतेचा प्रश्न आला. अधिक तपासणीअंती कामथे रुग्णालयातून माहिती पाठविताना दोन्हीकडे वेगळी आडनावे पाठविली गेली असल्याचे मान्य करण्यात आले.

सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र आडनावातील गोंधळामुळे गुरुवारी जाहीर आकडेवारीतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्येत त्याचा समावेश करण्यात आला नाही. हा समावेश याबाबतची माहिती घेतल्याने आज करण्यात आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या या घडीस 125 असल्याचा खुलासा जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER