सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर : आणखी सात जणांचे अहवाल येणे बाकी

Corona Virus Maharashtra

सांगली : सांगली जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 25 वर स्थिर असून आणखी सात जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. परदेशवारी करुन जिल्ह्यात आलेल्यां प्रवाशांची संख्या एकूण 1436 झाली आहे. यापैकी 49 जणांची करोना चाचणी झाली असून त्यामधील 25 जणांना करोनाची लागण झाल्याचे या आगोदरच स्पष्ट झाले आहे.

इस्लामपूरातील एकाच कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यां सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यामधीलही अनेकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. यापैकी 49 जणांना स्वतंत्र इमारतीमधील अलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे. यामधील 22 जण मिरजेतील क्रीडा संकुलात तर 27 जण इस्लामपूरातील स्वतंत्र इमारतीमध्ये आहेत. घरातील अलगीकरण कक्षात असलेल्या 1296 पैकी 248 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असूनही अद्यापही 1048 जण घरातील अलगीकरण कक्षात आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली आहेत.