भारतात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६,०४,६४१; नवे १९,१४८

corona patients

मुंबई : भारतात आज २ जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६,०४,६४१ झाली आहे. एकूण १७,८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नवे रुग्ण १९,१४८ आढळले असून गेल्या २४ तासांत ४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा १,८०,२९८ रुग्ण, गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण, एकूण मृत्यू ८,०५३ आणि गेल्या २४ तासांत ६९ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ४.९१, भारतात २.९५ आणि महाराष्ट्रात ४.४७ टक्के आहे. दरम्यान, जगात रुग्णांची संख्या १,०३,५७,६६२ झाली आहे. एकूण ५,०८,०५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४,१८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,६३,९३९ रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी २ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER